चिपळूण तालुक्यामध्ये विस्तीर्ण डोंगरपठारावर मौजे टेरव गावात श्री कुलस्वामिनी भवानी वाघजाई चे मंदिर आहे. त्या मंदिराची एकूण लांबी १२३ फूट असून दक्षिणेस ७६ फूट व उत्तरेस ३६ फूट आहे. पाया उंची ४ फूट व आतील उंची २२ फूट आहे. मंदिराला एकूण चार गाभाऱ्या पैकी ३ अनुक्रमे श्री भवानी (मधोमध) व दोनी बाजूस श्री शिवशंकर व नवदुर्गा असून समोर श्री वाघजाई आणि कालीकाई या देवतांसाठी आहेत. चार गाभाऱ्यावर मंदिराच्या ऊर्ध्व भागी दाक्षिणात्य घाटाचे गोलाकार कळस आहेत. मंदिरातील श्री भवानी आईची काळी पाषाणी मूर्ती ९ फूट उंच असून मूर्तीच्या हातामध्ये आयुधे असून, पायाखालील महिषासुराचा, माता त्रिशूल धारण करून वध करीत आहे.

ऐतिहासिक माहिती

निसर्गरम्य हरित कोकण भूमीतील चिपळूण तालुक्यामध्ये विस्तीर्ण डोंगरपठारावर मौजे टेरव नावाचे टुमदार गाव वसलेले आहे. गावाला लाभलेले निसर्ग सौंदर्याचे वरदान, यामुळे निसर्गप्रेमी लोकांना क्षणभर छोटे माथेरान वाटावे असा हा रमणीय परिसर आहे. अश्या या गावात श्री भवानी वाघजाईचे प्रमुख मंदिर हिरव्यागार गर्द वनराईतील आल्हाददायक वातावरणात शीतल वायूच्या सतत झुळका, लहरी खात दिमाखाने उभे आहे.

प्राचीन संस्कृतीची जाणीव करून देणाऱ्या व ३५० वर्षाचा इतिहास असलेल्या श्री कुलस्वामिनी भवानी वाघजाई तसेच श्री हनुमान मंदिराची अवस्था फार कुमकुवत व डळमळीत झालेली होती. ई. स. १८३९ साली सदर मंदिराचा जीर्नोधार झालेला होता. परंतु मंदिराची अलीकडील ढासळलेली अवस्था पाहून समस्थ ग्रामस्थांना कुलस्वामिनीच्या मंदिराची जीर्नोधाराऐवजी पुनर्रचना करण्याची गरज भासू लागली.

अधिक माहिती >>